व पु हे कलंदर व्यक्तीमत्व . त्यांची वाक्ये शांतपणे वाचावी लागतात आणि मग त्याचा सुरेख अर्थ उलगडत जातो तसा मनाला होणारा आनंद अवर्णनिय असतो.त्यांच्या विचारांचं हे सुंदर संकलन .........
समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते. त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.
असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो.पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो.स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात.प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीरअर्पण करणारा लंकाधिपती असतो,तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात.
माणसाचं जीवन अतिशय मोहक सुंदर व नाजूक घाग्यांनी परमेश्वराने विणलेलं असतं. ते आपण फार काळजीपुर्वक जपावं लागतं. त्यातला एक घागा जरी उसवला तरी तो तितक्याच कुशलतेने विणला जात नाही. उलट त्याच्या आसपासचे घागेच नकळत उसवले जातात. आणि मग पडणारं छिद्र मनाला, हृदयाला फार मोठठी जखम करतं. आयुष्यातली सारी गोडीच निघून जाते नि मग वाटतं मनाची ही पोकळी भरून कशी (निघणार) काढणार?
मैत्रितली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर, त्यातली सहजता. त्या सहजतेमधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातुनच तयार होते आणि दुधावरच छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्ह. सायीखालच्या दूधाला सायीचं दडपण वाटत नाही. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. आपल्याला लहानपणचे आठवते त्या आधीपासून आपण मैत्रित पडलेले असतो.
आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग..
नियतीचं माणसाला काही सुखांना पारखं करते,तेव्हा तिथे इलाजच नसतो.पण, त्याहीपेक्षा, माणुस जेव्हा दुसर्या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त.
जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.
'काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी..स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईल.स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते.आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षपूर्तिंसाठी नाही.आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतः कडुनहि अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणारया व्यथा.माझ्या मते हा जन्म अपेक्षपुर्तिंसाठी नाहीच, तो आहे परतफेडिसाठी...!!!
जेव्हा कुणी आपल्याला दु:ख देतं, तेव्हा त्याही पेक्षा मोठं दु:ख आपल्याही नकळत आपल्याकडून त्याना पोहोचलेलं असतं..!!
न मावणारं दु:ख नेहमीच जीवघेणं असतं.कारण तुमचा जीवच तेव्हा दुखापेक्षा लहान झालेला असतो.तेव्हा माणसाने नेहमीच दुखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं.दु:ख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं भांडं वापरायचं.पण इतरांच्या संदर्भात एका अश्रुनेहि भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं..!
आपण जेव्हा जेव्हा काही ना काही बोलू,तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्रगल्भ विचारांची देवाणघेवाण होते का ते पाहावं.असं प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज गप्प होतील.कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वाचन आलं, चिंतन आलं, मनन आलं,आपल्या गप्पांतून लाव्यालाव्या किती, निन्दानालस्ति किती, आणि सम्रुध्दता किती ह्याचा विचार व्हावा.
आजही देशस्त, कोकणस्थ, करहाडे, c.k.p.., लींगायात, s.k.p., हे भेदभाव नाहीत का?समोरची व्यक्ती ही आपल्यासारखीच जितिजागाती आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो?सौंदर्याच्या बाबतीतही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात, त्यातही भेदभाव आलाच.गरीबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजुन मधे येतात.परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टींभॉवती आजही आपण वावरत आहोत?कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं?ह्या असल्या गोष्टी follow करणार्यांना किंवा इनडाइरेक्ट्ली त्या गोष्टींना सपोर्ट करणार्यांना माणूस म्हणताच येणार नाही.
उथळ विचारांची माणसं देवावर आणि दैवावर विश्वास ठेवतात,शहानी आणि समर्थ माणसं कार्यकारणभावावर विश्वास ठेवतात..अस्थिर माणसं जशी बारमधे सापडतात तशी सिधदिविनायकाच्या रांगेतही..अर्थहीन श्रध्दा ही व्यसनासारखीच...
’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म.कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून?आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही,झंझावातालाही असतं.
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत
पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर....
आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, अपेक्षेचे हुन्द्के, दुक्खाचे कढ आणि आवर घातलेले आवेग - हे ज्याचे त्यालाच माहित असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मलुन् जनाच्या क्षणी असावा या सारखी इच्छा पूरी न होने ह्यासरखा शाप नाही. पण साक्षीदार मिलुन त्याला त्यातली उत्कटता न कलने ह्यासरखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपनाचा शाप बरा
Tuesday, April 15, 2008
Subscribe to:
Posts (Atom)
